Education is a magical key
Sun, 22 Sep 2024

Follow the stories of academics and their research expeditions
कामाला बसताना मोबाईल मुद्दाम लांब ठेवा. त्याचा निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल. जी कामे मोबाईल शिवाय करणे शक्य आहे. त्यासाठी मोबाईल अजिबात वापरु नका. उदा कामांची यादी करणे छोटीमोठी आकडेमोड, हिशोब करणे, गजर लावणे, कधी कधी पुस्तक बातम्या वाचणे, टीव्ही मालिका, ओटिटी वर वेब सीरीज वगैर पाहाणे तसेच खरेदी आदी मोबाईलचा वापर टाळणे आवश्यक आहे. मोबाईल हातात घेताना स्वतः लाच आता खरंच मोबाईल हातात घेण्याची वापरण्याची पाहण्याची गरज आहे का असे विचारा. मला खात्री आहे, की तुमचं अंतर्मन योग्य उत्तर देईल. तुम्ही जर मनापासून ठरवलंत तर मोबाईचा अतिवापर नक्की टाळता येऊ शकतो. सध्याच्या काळात मोबाईल हा सर्वांचाच अगदी जीव की प्राण झालेला आहे. छोटी छोटी मुलं सुद्धा अनेक रिल्स बनवून सोशल मीडियावर टाकताना आपण बघत असतो. कारण त्यांनाही समजलं आहे की रिल्स बनवून सोशल मीडियावर टाकलं की पैसे मिळतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे. लहान मुलं ही अनुकरणातून शिकत असतात.
जर आई-वडिलांनीच हातात मोबाईल घेतला तर मुलं काय करणार? त्यामुळे घरातील मोठ्या व्यक्तींनीच जर मुलं घरात असताना आपल्या हातामध्ये मोबाईल ऐवजी पुस्तक घेतले आणि त्यांच्यासमोर वाचत बसले तर त्याचा नक्कीच आदर्श लहान मुलं घेतील.त्यामुळे त्यांच्या हातात मोबाईल न देता छान छान गोष्टींची पुस्तके देता आली तर त्यासाठी प्रयत्न पालकांनी करावेत, किंवा त्यांना छान- छान चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, त्यांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून देता आलं पाहिजे त्यांनी जास्तीत जास्त मैदानावर खेळले पाहिजे, बरीच मुलं मोबाईल मध्ये खेळ खेळत असतात ते मोबाईल मध्ये न खेळता मोकळ्या मैदानावर खेळायला हवेत. कारण लहान मुलं ही खूप चंचल आहेत, एका जागेवर ते दोन ते तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसत नाहीत, परंतु मोबाईल मध्ये कंटिन्यू दहा ते बारा तास म्हणलं तरी त्यांना कंटाळा येत नाही. सतत मोबाईल बघितल्याने काय दुष्परिणाम होतात हे आपणा सर्वांनाच माहित आहेत, मुलं जेवढे जास्त मैदानावर खेळतील तेवढं त्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील. कारण त्यांच्यामध्ये खूप एनर्जी आहे आणि ती एनर्जी नको त्या ठिकाणी वाया जात आहे , कारण आपण सध्या असेही बघत आहे की लहान मुलं सुद्धा खूप चिंताग्रस्त आहेत, ते सतत चिडचिड करत असतात, म्हणून बरेच डॉक्टर सुद्धा लहान मुलांना खेळायला सोडा हाच उपाय सांगतात कारण खेळल्यामुळे त्यांच्या शरीरासोबतच मेंदूचा सुद्धा तेवढाच व्यायाम होतो.लहान मुलं हे आपल्या देशाचे भावी नागरिक आहेत. हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळेच या मातीच्या गोळ्यांना आकार देण्याचं काम पालक, शिक्षक, कुटुंब, समाज या सर्वांचेच आहे.
माझ्या अनुभवाप्रमाणे साधारणतः मुले वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत खूप ऍक्टिव्ह असतात.आपण त्यांना जेवढे ज्ञान देऊ ते त्यांना कमीच पडतं. म्हणून याच वयामध्ये जेवढे बालसंस्कार करता येतील, तेवढे नक्कीच केले पाहिजेत,असे मला वाटते.
कविता दराडे
शिक्षिका रमणबाग, पुणे
Sun, 22 Sep 2024
Sun, 15 Sep 2024
Tue, 10 Sep 2024
Leave a comment